प्रेक्षक नेहमी चांगला कंटेंट शोधत असतात असं का म्हणली प्राजक्ता माळी !
मराठी इंडस्ट्रीत खूप विविधता असलेला कंटेंट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि अश्यात सध्या चर्चेत असलेली वेब सीरिज म्हणजे देवखेळ ! या वेब सीरिज मध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी एक महत्वपूर्ण भूमिका बजावताना बघायला मिळते आणि देवखेळ प्रमोशन दरम्यान तिने मराठी कंटेंटच्या वाढीबाबत एक विधान केलं आहे.
प्राजक्ताला मराठी कंटेंटच्या वाढीबद्दल त्याचा पोहोच किती आहे आणि इतर प्रादेशिक सिनेमांच्या तुलनेत तो कुठे उभा आहे ? असं विचारण्यात आलं यावर ती म्हणाली
“मराठी सिनेमा नेहमीच कंटेंटवर आधारित राहिला आहे पण आज महाराष्ट्रात प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर विखुरले गेले आहेत ते हिंदी, साउथ इंडियन, हॉलीवूड आणि मराठी चित्रपट पाहत आहेत. त्यामुळे आपली स्पर्धा आता खूप मोठ्या बजेटच्या इंडस्ट्रीजसोबत थेट होते. तरीसुद्धा, आपली खरी ताकद आपल्या कथा आणि कलाकारांमध्ये आहे, विशेषतः रंगभूमीच्या भक्कम पार्श्वभूमीतून घडलेले काही उत्कृष्ट कलाकार.
OTTच्या काळात बॉलिवूड आणि प्रादेशिक सिनेमालाही प्रेक्षकांना थिएटरपर्यंत आणताना संघर्ष करावा लागत आहे पण मला खरंच वाटतं की चांगला कंटेंट नेहमीच आपला प्रेक्षक शोधतो तो सिनेमागृहात असो किंवा OTTवर ! कथा नव्या, रंजक आणि दृश्यदृष्ट्या भक्कम असतील तर प्रेक्षक प्रतिसाद देतात. दर्जेदार मराठी कंटेंटला सातत्याने पाठिंबा दिल्याबद्दल आणि नव्या, अर्थपूर्ण कथा पुढे आणल्याबद्दल मी ZEE5चे मनापासून आभार मानते”
पुढे प्राजक्ता ला विचारण्यात आलंइतका कंटेंट उपलब्ध असताना लोकांनी देवखेळ पाहण्यासाठी वेळ का द्यावा? या मालिकेत असं काय वेगळं किंवा आकर्षक आहे ?
या बद्दल बोलताना ती सांगते
“आपण हिंदी प्लॅटफॉर्मवर अमेरिकन आणि ब्रिटिश कंटेंट मोठ्या प्रमाणावर पाहतो पण ही जर कोकणाची कथा असेल आपल्या समस्या आणि आपल्या रितीरिवाजांवर आधारित असेल तर ती आपल्याशिवाय कोण दाखवणार? त्यासाठी आपली भाषा आणि आपले प्रेक्षक हवेत. आपल्या कथा आणि प्रश्न समजून घेण्यासाठी अशा वेब सिरीजची गरज आहे, कारण त्या आपण जितक्या प्रामाणिकपणे दाखवू शकतो तितकं इतर कोणीच दाखवू शकत नाही.
देवखेळ ची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे ती महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेली आहे. ही फक्त कोकणातल्या लोकांसाठी नाही. शेवटी कळतं की ही गोष्ट कोणत्याही राज्यात किंवा ठिकाणी घडू शकते. त्यातून मिळणारा संदेश खूप ठाम आहे आणि निर्माते जो काही विचार मांडू पाहत आहेत तो प्रभावी आहे आणि आजच्या काळाची गरजही आहे”
By Sunder
