EntertainmentMarathi

कोल्हापुरातील फेमस रॅपर ‘ए किंग’चं ‘वाघ आला’ हे हटके रॅप साँग प्रदर्शित, सोशल मीडियावर होतेय चर्चा

मराठी संगीतविश्वात आजकाल वेगवेगळ्या धाटणीची गाणी प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे मराठी संगीताचा प्रभाव महाराष्ट्रभर वाढत चालला आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील यंग रॅपर ‘ए किंग’च नुकतचं “वाघ आला” हे रॅप गाण प्रदर्शित झाल आहे. तर विशेष म्हणजे या गाण्याचं संपूर्ण चित्रीकरण कोल्हापुरातील ग्रामीण भागात झालं आहे. या गाण्याचे दिग्दर्शन ए किंग आणि विकास पवार यांनी केले आहे. या गाण्यात रॅपर ए किंग सोबत अनिता गनमाळे, मित्तल पांड्या, करण बोरे, सूरज कांबळे, सौरभ या कलाकारांनी काम केले आहे. या गाण्याची गीतरचना ए किंगने केली असून या गाण्याचे संगीत प्रवीण एवाळे यांनी केले आहे. राकेश कांबळे आणि विवेक साठे हे डीओपी आहेत. प्रोजेक्ट हेड योगेश आणि विरेन आर टू हे आहेत.

YouTube player

रॅपर ए किंग या गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगतो, “मला संगीताची लहानपणापासूनच आवड होती म्हणून मी संगीत क्षेत्रात आलो. रॅप, हिप हॉप हे संगीत मी क्रांतीचं प्रतीक मानतो. जेणेकरून ज्या आर्टिस्टला आपल्या लिखाणातून एखादा संदेश द्यायचा आहे. किंवा प्रबोधन करण्यासाठी रॅप संगीताचा उपयोग होतो. मला मोटिवेशनल, एनर्जेटिक आणि मनोरंजन करणार एक गाण बनवायचं होत. तर मला वाघ आला या शब्दांमधून गाण सुचत गेल. आणि मी ते रॅप फॉर्म मध्ये करायचं ठरवलं. रेकॉर्डिंगच्या वेळेस मी जवळपास तीनदा रिटेक दिले कारण हे एकदम हाय पिचवर गाणं आहे.”

पुढे तो गाण्याच्या चित्रीकरणाविषयी सांगतो,”कोल्हापुरातील शिरोली एम आय डी सीतील इंदिरानगर परिसरात या गाण्याचं चित्रीकरण झालं. या गाण्याच्या शूटींगचा किस्सा म्हणजे गावातले एक आजोबा अचानक सेटच्या इथे आले आणि म्हणाले मला घ्या गाण्यात तुमच गाण फेमस होईल. त्यांच्यासोबत गाण्याच शूट केल. आम्हाला गाण शूट करताना फार धम्माल आली. मी आशा करतो की तुम्हाला हे गाणं नक्की आवडेलं.”

 

 

By Sunder

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *