EntertainmentMarathi

घटस्थापनेच्या ​​​मुहूर्तावर ‘कुकाई’ चित्रपटाची घोषणा!!

आजवर अनेक चित्रपटांतून दमदार भूमिका केलेला अभिनेता अंकुश चौधरी आता “कुकाई” या भयपटातून वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीत भयपटांचे प्रयोग तुलनेने कमी झाले आहेत. त्यामुळे “कुकाई” हा भयपट, अंकुश चौधरीची वेगळी भूमिका असा योग या निमित्ताने जुळून आला आहे. नुकतेच घटस्थापनेच्या मुहूर्तावर या चित्रपटाची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आली.

स्वरुप स्टुडिओज आणि देवी सातेरी प्रॉडक्शन्स हे चित्रपटाची निर्मिती करत असून प्रभाकर परब, सचिन नारकर, विकास पवार हे चित्रपटाचे निर्माता आहेत, तर अभिनेत्री जान्हवी किल्लेकर तिच्या जान्हवी प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेद्वारे प्रथमच सहनिर्माती म्हणून पदार्पण करत आहे. शब्बीर नाईक यांनी कथालेखन आणि दिग्दर्शन केले आहे. आशिष टिळक आणि शब्बीर नाईक यांनी पटकथा आणि संवाद लेखन केले आहे. रोहन मडकईकर छायांकन, चिनार महेश संगीत दिग्दर्शन तर अतुल साळवे कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहत आहेत.

सुप्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरींसह या चित्रपटाच्या निमित्ताने कोण भेटीला येणार त्यांची नावे मात्र अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.अभिनेता अंकुश चौधरीने त्याच्या प्रत्येक चित्रपटातून वेगळे काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे “कुकाई” या चित्रपटातून अंकुश कोणत्या रुपात प्रेक्षकांसमोर येतो याची उत्सुकता वाढली आहे. त्याशिवाय अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने आजवर अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली असून आता सहनिर्माती म्हणून ती नवी जबाबदारी उचलत तिने “कुकाई” या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाची निवड केली आहे.

 

 

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *