EntertainmentMarathi

गारवा फेम गायक मिलिंद इंगळे यांचे नवीन गाणे “सुंदर कोकणराज…”

गारवा फेम गायक मिलिंद इंगळे यांचे नवीन गाणे “सुंदर कोकणराज…”

-सप्तसूर म्युझिकतर्फे कोकणराज म्युझिक व्हिडिओ लाँच

उन्हाळा सुरू झाला की वेध लागतात कोकणात जाण्याचे… म्हणूनच सप्तसूर म्युझिकनं कोकणाचं सौंदर्य दाखवणारा म्युझिक व्हिडिओ लाँच केला आहे. गारवा फेम गायक मिलिंद इंगळे यांनी हे गाणं गायलं असून, ‘आमच्या मनात एकच ध्यास, होवचो कोकण सुंदर राज’ असे शब्द असलेल्या या म्युझिक व्हिडिओमध्ये प्रभाकर मोरे, वैष्णवी जोशी चमकले आहेत.

सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांनी कोकणराज या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. मंगेश केरकर यांनी गीतलेखन केलं आहे. संगीत संयोजन कलमेश भडकमकर यांचं आहे. कृतिक माझिरे यांनी कोरिओग्राफी आणि दिग्दर्शन केलं आहे. कोकणी पद्धतीनं गाऱ्हाणं मनोहर गोलांबरे यांनी घातलं आहे. सप्तसूर म्युझिकनं आतापर्यंत केलेल्या अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये या नव्या म्युझिक व्हिडिओची भर पडली आहे.

गावच्या वेशीवरचा वेताळ, आजीच्या हातच्या घासापासून कोकणाच्या संस्कृतीचं दर्शन या म्युझिक व्हिडिओत घडवण्यात आलं आहे. म्युझिक व्हिडिओच्या माध्यमातून कोकणी जगण्याची जणू गोष्टच सांगण्यात आली आहे. अतिशय श्रवणीय असलेल्या या गीताला प्रभाकर मोरे आणि वैष्णवी जोशी यांच्या अभिनयानं आणखी खुलवलं आहे. त्याशिवाय नेत्रसुखद चित्रीकरणाचीही त्याला जोड लाभलीय. त्यामुळे प्रत्येकाला हा म्युझिक व्हिडिओ आपलासा वाटेल यात शंका नाही. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात कोकणाची संस्कृती अनुभवासाठी कोकणराज म्युझिक व्हिडिओ पाहायलाच हवा.

YouTube player

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *