EntertainmentMarathi

पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिकेला उत्कंठावर्धक वळण; मास्टरमाईंड प्लॅन मागे आहे ‘हा’ चेहरा

‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिकेला उत्कंठावर्धक वळण; मास्टरमाईंड प्लॅन मागे आहे ‘हा’ चेहरा

कलर्स मराठीवरील ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. ही मालिका घराघरात पोहोचली असून सगळे कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. प्रेक्षकवर्ग या सगळ्या कलाकारांवर भरभरून प्रेम करत आहेत. या मालिकेत अर्जुन आणि सावीवर अनेक संकटे आलीत पण त्यांनी त्या प्रत्येक संकटाला मिळून सडेतोड उत्तरं दिली. सावीने प्रत्येक कठीण परिस्थितीत अर्जुनची साथ दिली आहे. अशातच आता या मालिकेने उत्कंठावर्धक वळण घेतले आहे.

खऱ्या अर्जुनला विद्याधर दादाचं सत्य समजल्यामुळे त्याची हत्या करण्यात आली होती पण हे सावीला आणि सावीला अजूनही खोट्या अर्जूनवर संशय आलेला नाही.

नुकताच या मालिकेचा नवीन प्रोमो प्रदर्शित झाला आहे. आतापर्यंतच्या भागात प्रेक्षकांना असे दिसत होते की, भीमासदनात प्रवेश केलेला अर्जुन हा खोटा आहे आणि त्याला घरी आणण्यात विश्वंभर मामाचा हात आहे .
पण खरंतर, या खोट्या अर्जुनला पैसे देऊन सावीनेच घरात आणले हे समजले आहे; म्हणजे शत्रूंना त्यांच्याच खेळात मात देणार सावी.
सावीच या सगळ्या प्लॅनची मास्टरमाईंड आहे. हा बनावट अर्जुन कुठे आणि कसा भेटला सावीला? काय असेल त्याला घरात आणण्या मागचा सावीचा प्लॅन ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आता प्रेक्षकांना येणाऱ्या एपिसोडमध्ये पाहायला मिळतील.

पाहात राहा ‘प्रितीचा वनवा उरी पेटला’ दररोज, रात्री १० वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही #JioCinema वर तुम्ही पाहू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *