EntertainmentHealth

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये गौरव मोरे आणि मौसमी चटर्जीचा ‘रिमझिम गिरे सावन’ गाण्यावर डान्स

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये गौरव मोरे आणि मौसमी चटर्जीचा ‘रिमझिम गिरे सावन’ गाण्यावर डान्स
या वीकएंडला हास्य, मस्ती आणि मौज यांनी भरलेल्या रजनीसाठी सज्ज व्हा, कारण सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ या कॉमेडी शो मधले गुणी विनोदवीर सदाबहार अभिनेत्री मौसमी चटर्जीच्या उपस्थितीत काही धमाल अॅक्ट सादर करणार आहेत!
अनेक भन्नाट गॅग्जनी भरलेल्या या भागात प्रत्येक कलाकार आपल्या जबरदस्त अॅक्टच्या माध्यमातून मौसमीचे मन जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसेल. याच प्रयत्नात गौरव मोरे मौसमी चटर्जीसोबत तिच्या 1979 मधील ‘मंझिल’ चित्रपटातील ‘रिमझिम गिरे सावन’ हे गाणे मंचावर जिवंत करताना दिसेल. स्वतः उत्तम विनोदवीर असल्याने अर्थात या अॅक्टमध्ये तो चिमूटभर विनोद नक्कीच घालेल! या अॅक्टमध्ये तो एका रंगीबेरंगी छत्रीचा प्रॉप म्हणून उपयोग करेल आणि मौसमीला एक गुलाब भेट देईल आणि तसे करून भोवळ येऊन पडेल! हा अॅक्ट भलताच गोड आहे आणि प्रेक्षकांच्या मनाला तो नक्कीच गुदगुल्या करेल!
मौसमी चटर्जीसोबत एका मंचावर परफॉर्म करण्याचा आपला अनुभव सांगताना गौरव मोरे म्हणतो, “मौसमी चटर्जीसोबत एका मंचावर परफॉर्म करणे माझ्यासाठी स्वप्नवत होते. या परफॉर्मन्समधून तिच्यातला जो डौल आणि खिलाडूवृत्ती दिसली, ती अद्भुत आणि प्रेरणादायक होती. इतक्या महान अभिनेत्रीसोबत काम करता आले, हा मी माझा गौरव मानतो. तिच्या उदार स्वभावामुळे आणि हुशारीमुळे तिच्यासोबत शेअर केलेला प्रत्येक क्षण उन्नत होऊन गेला!
बघायला विसरू नका, ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ या शनिवारी रात्री 9:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *