EntertainmentMarathi

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार श्रीमती रोहिणी हट्टंगडी व मा.श्री. अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार तहहयात विश्वस्त मा.श्री. शरद पवार यांच्या हस्ते प्रदान

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार श्रीमती रोहिणी हट्टंगडी व मा.श्री. अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार तहहयात विश्वस्त मा.श्री. शरद पवार यांच्या हस्ते प्रदान.

नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ १४ जून २०२४ रोजी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी रंगकर्मींना त्यांच्या रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मा.श्री. अशोक सराफ आणि मा.श्रीमती रोहिणी हट्टंगडी यांना तहहयात विश्वस्त मा.श्री. शरद पवार व इतर मान्यवर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

तसेच या सोहळ्याचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण नाटय संकुलाच्या नूतनीकरणानंतर यशवंत नाट्य मंदिर रसिकार्पण सोहळा देखील संपन्न झाला. ह्या सोहळ्याला अ.भा.मराठी नाटय परिषदेचे तहहयात विश्वस्त मा.श्री. शरद पवार साहेब, नाटयसंमेलनाध्यक्ष मा.डॉ. जब्बार पटेल, अ.भा.मराठी नाटय परिषदेचे तहहयात विश्वस्त मा.श्री. शशी प्रभू, उद्योगमंत्री तथा अ.भा.मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त मा.ना.श्री. उदय सामंत, अ.भा.मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त मा.श्री.मोहन जोशी, अ.भा.मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त मा.श्री.अशोक हांडे, पोलीस आयुक्त मा.श्री. विवेक फणसळकर, यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तसेच ह्या सोहळ्यात प्रायोगिक ८ पारितोषिके, व्यावसायिक १४ पारितोषिके आणि नाट्य परिषदेकडून देण्यात आलेली १३ पारितोषिके अशी एकूण ३५ पारितोषिके प्रदान करण्यात आली.

शंभराव्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या नाट्य कलेचा जागर महोत्सवमध्ये अंतिम फेरीत बालनाट्य, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन, एकपात्री, नाट्य अभिवाचन, एकांकिका ह्या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचे सादरीकरण झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *