EntertainmentMarathi

सोशल मीडियावर होणार फक्त तात्यांची चर्चा, जी एम ई म्युझिकवर ‘तात्या सोडाना’ गाण प्रदर्शित

सोशल मीडियावर होणार फक्त तात्यांची चर्चा, जी एम ई म्युझिकवर ‘तात्या सोडाना’ गाण प्रदर्शित

मराठी संगीत इंडस्ट्रीमध्ये नवनवीन गाणी व्हायरल होताना दिसत आहेत. त्यात तात्यांचे व्हिडाओ व्हायरल होताना दिसत आहेत.ते तात्या नेमके कोण ? याचा खुलासा झाला आहे. जी एम ई म्युझिक रेकॉर्ड लेबल ‘तात्या सोडाना’ हे भन्नाट कॉमेडी तसेच डान्सीकल गाणं प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. सध्या सोशल मीडियावर या गाण्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. या गाण्याचे गीतकार आणि संगीतकार हे सनी महादेव आहेत. अण्णा भंडारी आणि श्रावणी काळे हे कलाकार या गाण्यात आहेत. तर हे गाणं गायिका वैष्णवी आदोडे हीने गायले असून या गाण्यातील रॅप सनी महादेव याने गायलं आहे. शिवाय अविनाश नलावडे हे या गाण्याचे नृत्यदिग्दर्शक आहेत. जी एम ई म्युझिकवर या आधी गुलाबी साडी फेम संजू राठोडने गायलेली ‘कायमचा सिंगल आणि मुखडा’ ही दोन गाणी तुफान व्हायरल झाली होती. या गाण्यांना मिलीयन्स व्ह्यूजपेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे.

YouTube player

या गाण्याचे संगीतकार, गीतकार सनी महादेव गाण्याविषयी सांगतात, “महाराष्ट्रात तात्या नावाने अनेक रील्स व्हायरल होत होत्या. युवकांमध्ये या शब्दाला घेऊन अनेक कॉमेडी व्हिडीओ बनवण्यात आले. एक संगीतकार म्हणून मला तात्या या शब्दाला घेऊन एक कथानक सुचलं आणि मी ते गाण्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. आणि अश्याप्रकारे मला या गाण्याची संकल्पना सुचली. मला खात्री आहे की महाराष्ट्रातील प्रेक्षकांना हे गाणं नक्की आवडेल.”

पुढे ते सांगतात, “हे गाणं रेकॉर्डींग स्टुडिओत बनवताना आमच्यासमोर खूप मोठ चॅलेंज होतं. कारण बालवयापासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनीच हे गाण ऐकावं यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. कारण हे गाणं अडल्टनेसकडे न जाता सौम्यपद्धतीने मांडलं. गायिका वैष्णवी आदोडे हीने सुंदर पद्धतीने हे गाण गायलं आहे. तसेच या गाण्याच्या पोस्ट प्रोडक्शनची जबाबदारी एन डी ९ स्टुडिओकडे होती. या गाण्याचे चित्रीकरण पुण्यातील एअरपोर्ट नजीक झाले आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *