55 व्या ‘इफ्फी’च्या सातव्या दिवशी आर. माधवन अभिनीत ‘हिसाब बराबर’ हा व्यवस्थेविरुद्ध सामान्य माणसाचा संघर्ष : नील नितीन मुकेश
55 व्या ‘इफ्फी’च्या सातव्या दिवशी आर. माधवन अभिनीत ‘हिसाब बराबर’ हा व्यवस्थेविरुद्ध सामान्य माणसाचा संघर्ष : नील नितीन मुकेश
गोवा इथे सुरू असलेल्या 55 व्या ‘इफ्फी’च्या 7 व्या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत, ‘हिसाब बराबर’ या चित्रपटाचे कलाकार आणि सहकर्मचारी यांनी प्रसार माध्यमांतील प्रतिनिधींबरोबर संवाद साधला. गोवा येथे पीआयबी मीडिया सेंटर येथे ही पत्रकार परिषद झाली. ‘हिसाब बराबर’ ही भारतीय रेल्वेतील एका मेहनती तिकीट तपासनीस – राधे मोहन शर्मा याची कथा आहे. हे पात्र लोकप्रिय अभिनेता आर. माधवन याने साकारली आहे.आपल्या सुरुवातीच्या टिप्पणीमध्ये , चित्रपटाचे निर्माते शरद पटेल यांनी चित्रपटाचे वर्णन करताना, एक गंभीर संदेश देणारे- विडंबन म्हणून केला आहे. ते पुढे म्हणाले की , हा चित्रपट पाहिल्यानंतर, प्रेक्षकांना त्यांच्या बँक व्यवहाराचा इतिहास काळजीपूर्वक पाहण्याची प्रेरणा मिळेल.((छाया : रमाकांत मुंडे)
याचे कारण असे की, राधेजी आपल्या सर्व खर्चाचा तपशील ठेवण्यात अत्यंत परिपूर्ण आहे आणि त्याला ओळखणारे लोक तर त्याला मानवी कॅल्क्युलेटर म्हणून संबोधत असतात. त्याला आपल्या बँक खात्यामध्ये एक छोटीशी तफावत आढळते ज्यामुळे त्याच्या व्यवस्थित जीवनात एकदम गोंधळ निर्माण होतो. अधिक तपास करताना, त्याच्या लक्षात येते की, सामान्य लोकांच्या बचतीवरच दरोडा घालणारा एक मोठा घोटाळा केला गेला आहे. बँकेचा उर्मट, निर्दयी मुख्य कार्यकारी अधिकारी मिकी मेहताच्या विरोधात या प्रकरणात सामना करताना, राधेला त्याची नोकरी आणि घर गमवावे लागते. परंतु झोपडपट्टीतील फसवणूक झालेल्या रहिवाशांकडून अनपेक्षित पाठिंबा मिळतो.
चित्रपटातील मिकी मेहताची- खलपात्र व्यक्तिरेखा अभिनेता नील नितीन मुकेश याने साकारली आहे. यावेळी नील नितीन मुकेश याने सांगितले की, त्याच्या अभिनय कारकिर्दीत आत्तापर्यंत कधीही त्याने कॉमिक भूमिका केलेली नाही. त्याच्याच शब्दात सांगायचे झाले तर, हा चित्रपट एक सामान्य माणूस विरुद्ध एक मोठी यंत्रणा असा आहे.
चित्रपटातील तिच्या व्यक्तिरेखेवर प्रकाश टाकताना, अभिनेत्री कीर्ती कुल्हारीने सांगितले की, या चित्रपटात ती एक कठोर पोलीस अधिकारी असूनही, तिच्या या पात्राला एक रोमँटिक कोन आहे. रेल्वे प्रवासादरम्यान हा कोन विकसित होतो. कीर्तीने सांगितले की, तिच्या भूमिकेमध्ये असलेली शूचिता आणि निरागसता अगदी वेगळी, नवीन आहे. त्यामुळे तिला ही भूमिका पडद्यावर साकारताना खूप आनंद मिळाला. तिने असेही सांगितले की, “एक अभिनेता म्हणून माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट लक्षात आली ती, म्हणजे, मी कोणत्याही प्रकारचे पात्र साकारू शकते आणि ‘हिसाब बराबर’ ने नक्कीच त्या दिशेने पाऊल टाकण्याची संधी मला दिली आहे”.
‘हिसाब बराबर’ मधला ‘हिसाब’ शेवटी स्थिरावतो जेव्हा राधेला कळते की प्रेम आणि नातेसंबंध यांची मोजदाद काही एखाद्या संख्येप्रमाणे करता येत नाही.
अश्विनी धीर या एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखिका आहेत. त्यांनी ‘एक दोन तीन’, ‘अतिथी तुम कब जाओगे?’ आणि ‘सन ऑफ सरदार’ या सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तसेच त्यांनी मराठी चित्रपट आणि इतर लोकप्रिय टीव्ही शोंची निर्मिती केली आहे
By Sunder M