EntertainmentMarathi

अमृता खानविलकर म्हणते ” म्हणून यंदाचा गुढी पाडवा आहे खास”

अमृता खानविलकर म्हणते ” म्हणून यंदाचा गुढी पाडवा आहे खास”

“एकम” मधला पहिला गुढी पाडवा असा साजरा करणार अमृता खानविलकर !

कायमच अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर ! अमृताने वर्षभरात अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स मधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे अजून येणाऱ्या काळात वैविध्यपूर्ण भूमिका मध्ये ती मोठ्या पडद्यावर देखील दिसणार आहे. अमृता कायम चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

काही दिवसापूर्वी अमृताने मुंबईत स्वतःच्या हक्काच असं एक सुंदर आणि प्रशस्त घर देखील घेतलं आहे. तिने तिच्या घराला एक सुंदर नाव देखील ठेवलं असून मुंबई टाईम्स सोबत बोलताना अमृता ने तिच्या गुढी पाडवा प्लॅन्स बद्दल तर सांगितलं आहे पण सोबतीला तिच्या नवीन घरातला हा पहिला गुढी पाडवा तिच्या साठी किती खास आहे या बद्दल तिने भावना व्यक्त केल्या आहेत.

अमृता सांगते “गुढीपाडवा नेहमीच माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा सण राहिला आहे. दिवाळीनंतर तो एकमेव सण आहे जो माझ्यासाठी सर्वात खास आहे. वर्षानुवर्षे हा सण अधिक महत्त्वाचा होत गेला, कारण त्याच्याशी जोडलेल्या बालपणीच्या आठवणी अतिशय सुंदर आहेत.

जेव्हा मी आणि अदिती लहान होतो आणि पुण्यात राहत होतो, तेव्हा दरवर्षी सकाळी लवकर उठून बाबा गुढीपाडव्याच्या सगळ्या विधी पार पाडत असत. प्रत्येक गोष्ट ते अगदी बारकाईने करायचे. पूजा संपल्यानंतर ते आम्हाला बसवून गुढीचे महत्त्व समजावून सांगायचे. ते म्हणायचे की गुढी ही आपल्या स्वप्नांची, इच्छांची आणि सकारात्मक ऊर्जेच्या प्रकटीकरणाची (manifestation) निशाणी आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, ती मराठी नववर्षाची सुरुवात दर्शवते—नूतन वर्षाची सुरुवात.

त्यांनी सांगितलेली एक गोष्ट माझ्या मनात कायम घर करून बसली आहे— “गुढी आकाशाला भिडली पाहिजे.” या वाक्यातली भावना मला खूप खोलवर स्पर्शून गेली आणि तीच माझ्या आयुष्याची मार्गदर्शक तत्त्व झाली. याचा अर्थ असा की आपल्या स्वप्नांनी, इच्छांनी, सकारात्मक ऊर्जेच्या प्रकटीकरणाने—आणि त्याचबरोबर आपल्या मेहनतीने, समर्पणाने, व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात—नेहमीच उंच भरारी घ्यायला हवी. जशी गुढी उंच उभारली जाते, जी विजय आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक असते, तशीच आपली ध्येये आणि महत्वाकांक्षा देखील उंच जाऊन आकाशाला स्पर्श करायला हवीत.

यंदाचा गुढीपाडवा माझ्यासाठी खरंच एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखा आहे. मी तो माझ्या स्वतःच्या घरी साजरा करत आहे—त्या घरात, जे मी स्वतःसाठी विकत घेतल आहे.

एवढी वर्षं इंडस्ट्रीत काम करत, झगडत, सिनेमे करत, वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स हाताळत, आज मी ठामपणे सांगू शकते की एकम हे माझं खरंखुरं घर आहे. या घरात मला केवळ माझी जागा मिळाली असं नाही, तर मी स्वतःला सापडलं आहे. येथे मला खरी शांतता आणि स्थैर्य लाभलं आहे.

आयुष्यात खूप चढ-उतार आले, पण तरीही या घराने एका वेगळ्याच जादूने मला सांभाळलं आहे, आणि स्वतःचीही काळजी घेतली आहे. हे घर जसं आकाराला आलं, त्यातून मला नवी उमेद, आत्मविश्वास, आणि एक नवीन ऊर्जा मिळाली आहे”

स्वप्नपूर्ती करणार अमृताच ” एकम ” ही जागा तिच्या मनाच्या खूप जवळची आहे आणि म्हणून हा गुढी पाडवा तिच्या साठी खूप खास आहे यात शंका नाही ! येणाऱ्या काळात अमृता अनेक हिंदी मराठी प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार असून आगामी ” सुशीला – सुजीत ” मध्ये ती पहिल्यांदा आयटम साँग करणार आहे.

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *