EntertainmentMarathi

लव फिल्म्सच्या ‘देवमाणूस’मधील ‘कर वार’ हे दशावतारावरआधारित भक्तीगीत प्रदर्शित

लव फिल्म्सच्या ‘देवमाणूस’मधील ‘कर वार’ हे दशावतारावरआधारित भक्तीगीत प्रदर्शित

लव फिल्म्सचा पहिला मराठी चित्रपट ‘देवमाणूस’, नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून उत्कट कथानकाने, उत्कृष्ट अभिनयाने, नेत्रदीपक दृश्यांनी आणि लोकप्रिय संगीताने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने सर्वत्र यशस्वी कामगिरी केली आहे.

गाणी संगीतप्रेमींच्या पसंतीस उतरत असताना या संगीतिक प्रवासात ‘कर वार’ हे आणखी एक रत्न जोडले गेले आहे. आदर्श शिंदे यांच्या जोशपूर्ण आवाजातील या भक्तिगीताला प्रशांत मडपुवार यांचे शब्द लाभले आहेत तर संगीत रोहन-रोहन या सुप्रसिद्ध जोडीने दिले आहे. या गाण्याद्वारे दशावताराचा साजशृंगार दृश्यात्मक आणि सांगीतिक पद्धतीने उभा करण्यात आला असून चित्रपटातील हा अत्यंत निर्णायक क्षण आहे, जो अतिशय प्रभावीपणे सादर करण्यात आला आहे.

YouTube player

या गाण्याबद्दल गायक आदर्श शिंदे म्हणतात, ‘ ‘कर वार’ गाणे गाणे हे माझ्यासाठी एक अत्यंत आध्यात्मिक अनुभव होता. दशावतारातील उर्जा आणि गीतांमध्ये असलेली ताकद यामुळे मी संपूर्णपणे या गाण्यात गुंतलो होतो. हे फक्त गाणे नाही, तर एक प्रार्थना आहे. ज्यातून भक्ती आणि शक्तीचा संगम झाला आहे. रोहन-रोहन यांच्यामुळे मला हे गाणे गाण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी नेहमीच ऋणी राहीन.”

संगीतकार रोहन-रोहन म्हणतात, “कर वार’ बनवताना आम्हाला भक्ती आणि नाट्य यांच्यात सुंदर समतोल साधायचा होता. या चित्रपटातील इतक्या महत्त्वाच्या क्षणासाठी गाणे तयार करणे हे एक आव्हानही होते आणि आनंदही. हे गाणे प्रेक्षकांच्या मनातही तितकेच खोलवर रुजेल, अशी आम्हाला आशा आहे.”

लव फिल्म्स प्रस्तुत ‘देवमाणूस’ या चित्रपटाचे तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शक असून लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्माते आहेत. ‘देवमाणूस’ २५ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *