EntertainmentMarathi

चंद्रमुखीसाठी अमृताला मिळाला यंदाचा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार !

महाराष्ट्र राज्याने मला एक खास ओळख दिली आहे आणि म्हणून हा पुरस्कार माझ्यासाठी खास आहे असं का म्हणाली अमृता !

असं म्हणतात ना प्रत्येक पहिल्या गोष्टीचं कौतुक काही वेगळं असतं असं काहीस अभिनेत्री अमृता खानविलकरच्या आयुष्यात सुद्धा घडलंय ! काल 60 आणि 61 मराठी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्या अगदी दिमाखात संपन्न झाला आणि या पुरस्कार सोहळ्यात अमृताला चंद्रमुखी साठी उत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिग्गज कलाकार नेते मंडळीच्या उपस्थितीत हा सोहळा अगदी थाटात पार पडला.

अमृता सध्या भारतात नसली तरी अगदी साता समुद्रापार राहून तिने या बद्दल चा उत्साह आणि आनंद शेयर केला आहे अमृता म्हणते “आज माझ्यासाठी माझ्या महाराष्ट्र राज्याने मला हा मान देणं खरंखरोच खूप जास्त खास आहे. ” चंद्रमुखी ” साठी आम्ही सगळ्यांनी एक टीम म्हणून काम केलं अगदी दिग्दर्शका पासून ते स्पॉट बॉय पर्यंत यांनी घेतलेली मेहनत ही कायम सार्थकी लागली आहे. ठिकठिकाणी या चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम हे आजही दिसून येतंय. मला जर एक अभिनेत्री म्हणून ओळख मिळालेली आहे चंद्रमुखी साठी तर ती मला माझ्या महाराष्ट्र राज्याने दिली आहे. महाराष्ट्र राज्य पुरस्काराने सन्मानित होणं हा क्षण मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही अर्थातच हा माझा पहिला वाहिला राज्य पुरस्कार आहे यातून मी फक्त ऊर्जा आणि नवनवीन दर्जेदार काम करत राहायचं आहे. चांगल्या लोकांबरोबर काम करायचं आणि आपली कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहचवायची आहे. या निमित्ताने संपूर्ण ज्युरी टीमचे महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार टीमचे खूप खूप आभार त्यांनी हा क्षण माझ्या आयुष्यात आणला माझं कामाचं कौतुक करून हा खास पुरस्कार मला दिला या बद्दल मी कायम ऋणी राहील खूप खूप धन्यवाद”

चंद्रमुखी सारख्या चित्रपटातील अमृताची भूमिका ही आजही प्रेक्षकांच्या मनात तितकीच घर करून आहे आणि म्हणून तिच्यासाठी हा चित्रपट देखील तेवढाच खास आहे. आजवर अमृताने वैविध्यपूर्ण आव्हानात्मक भूमिका साकारल्या आणि त्या आजही प्रेक्षकांना तितक्याच भावतात.

येणाऱ्या काळात अमृता अनेक दर्जेदार भूमिका मधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळतंय.

 

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *