EntertainmentMarathi

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘स्मार्ट सुनबाई’ या चित्रपटाचे मुख्य रंगतदार पोस्टरचे अनावरण !

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत, शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि गोवर्धन दोलताडे, गार्गी निर्मित 21 नोव्हेंबर 2025 ला प्रदर्शित होत असलेला ‘स्मार्ट सुनबाई’ या चित्रपटाचे मुख्य रंगतदार पोस्टरचे अनावरण!

मराठी चित्रपट सृष्टीतील चर्चेत असलेला आगामी सिनेमा ‘स्मार्ट सुनबाई’ येत्या २१ नोव्हेंबर २०२५ पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि गोवर्धन दोलताडे, गार्गी निर्मित, कार्तिक दोलताडे पाटील सह निर्मित या सिनेमाच्या पहिल्या पोस्टरने प्रेक्षकांच्या उत्सुकतेला नवीन उंची दिली होती, तर आता मुख्य असलेलं रंगतदार पोस्टरही प्रेक्षकांसमोर आलय. विशेष आनंदाची बाब म्हणजे महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पोस्टरचे अनावरण करण्यात आले, यावेळी लेखक , निर्माते गोवर्धन दोलताडे व अभिनेते रोहन पाटील उपस्थित होते.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य पोस्टरचे प्रकाशन संपूर्ण टीमसाठी अद्भुत, उल्लसित आणि अभिमानास्पद क्षण ठरला.
या खास प्रसंगात त्यांनी केवळ पोस्टरचे अनावरण केले नाही, तर टीमचं कौतुक सुद्धा केलं. त्यांच्या मनापासून दिलेल्या शुभेच्छांनी उत्साह, आनंद आणि आत्मविश्वासाची लाट पसरली, ज्याने हा क्षण एकदम स्मरणीय आणि प्रेरणादायी बनला.

या सिनेमात मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत व लोकप्रिय चेहरे संतोष जुवेकर, रोहन पाटील , भाऊ कदम, किशोरी शहाणे मोहन जोशी, दीपक शिर्के, अंशुमन विचारे, विनम्र बाबल, सायली देवधर, प्राजक्ता गायकवाड, प्राजक्ता हनमगर, स्नेहल शिदम, उषा नाईक, भक्ती चव्हाण, दीप्ती सोनवणे, अनुष्का बेनके, पूजा राजपूत, सुचिका जोशी, विद्या मेहेत्रे ,आर्या सकुंडे, वैशाली चौधरी , सपना पवार ,कांचन चौधरी यांची एकत्रित उपस्थिती हा चित्रपट खास बनवते. या कलाकारांची अनोखी केमिस्ट्रीच ‘स्मार्ट सुनबाई’ ची खरी ताकद ठरणार आहे.

चित्रपटाची कथा आणि लेखन योगेश शिरसाट यांनी केले असून, विजय नारायण गवंडे,साई – पियुष यांनी या सिनेमाला बहारदार संगीताची साथ दिली आहे. गीतकार वैभव देशमुख, अदिती द्रविड असून अजय गोगावले, वैशाली माढे, आनंदी जोशी, सावनी रवींद्र, उर्मिला धनगर यांचे सुरेल स्वर या सिनेमाला लाभले आहेत.

‘स्मार्ट सुनबाई’ हा कौटुंबिक मेजवानीसारखा अनुभव देणारा सिनेमा आहे, जो संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर हसण्याची, आनंदाची छाप सोडेल.

 

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *