गौतमी पाटीलच्या ‘सोनचाफा’वरील डान्सच्या रीलची हवा, गाणं घालतंय धुमाकूळ
गौतमी पाटीलच्या ‘सोनचाफा’वरील डान्सच्या रीलची हवा, गाणं घालतंय धुमाकूळ
‘माझ्या रुपावर फिदा झाली दुनिया सारी’ या गाण्याने सध्या सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घातला आहे. अर्थातच हे धुमाकूळ घालणारं गाणं नृत्यांगना गौतमी पाटीलच आहे. ‘सोनचाफा’ हे गाणं सध्या तुफान गाजतंय. गौतमीच्या मोहक अदा आणि नृत्याने या गाण्याला विशेष वजन आलं. नवरात्रोत्सवात तर या गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून धरलं. आणि गौतमीही यंदाच्या नवरात्रीत या गाण्यावर थिरकत साऱ्यांच मन जिंकताना दिसली. यानंतरही हे गाणं साऱ्यांना थिरकायला भाग पाडतंय. गाण्याच्या ओळींनी आणि गौतमीच्या नृत्याने अर्थातच थिरकायला भाग पाडलं आहे. या गाण्यातील गौतमीच्या डान्ससह तिचा लूकही बराच व्हायरल झाला.

गाणं प्रदर्शित झाल्यानंतर या गाण्यावर गौतमी बरेचदा इव्हेंटमध्ये थिरकतानाही दिसली. यावेळी तिचा लूकही अनेकांच्या पसंतीस पडला. याचे अनेक रील व्हिडीओ तुफान व्हायरल झाले. ‘साईरत्न एंटरटेनमेंट’ या प्रॉडक्शन हाऊसच्या या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिलेली पाहायला मिळत आहे. हे गाणं निर्माते संदेश विठ्ठल गाडेकर आणि सुरेश विठ्ठल गाडेकर यांनी निर्मित केलं आहे. दिग्दर्शक अर्चित वरवडे यांनी हे गाणं दिग्दर्शित केलं आहे. ‘साईरत्न एंटरटेनमेंट’साठी गौतमी पाटीलने ‘सुंदरा’ आणि ‘कृष्ण मुरारी’ ही दोन गाणी केली आहेत. या तिच्या दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आणि आता सोनचाफालाही भरपूर प्रेम दिलं.
संगीतकार रोहित नागभिडे यांनी संगीत केलेलं हे गाणं गायिका मुग्धा कऱ्हाडे यांनी स्वरबद्ध केलं आहे. तर गाण्याचे बोल वैभव देशमुख यांनी लिहिले आहे. सध्या गौतमीच ‘सोनचाफा’ हे गाणं साऱ्यांच्या पसंतीस पडत असून यावर अनेकजण थिरकताना दिसत आहेत.
By Sunder M