EntertainmentMarathiReview

दुःख, एकटेपणा, आणि आनंदमयी आशेची किरण गुंफणारी, एक हृदयस्पर्श कहाणी “सकाळ तर होऊ द्या”

एक रोमांचक आणि रहस्यमय,उत्कठता वाढवणाऱ्या चित्रपटाची निर्मिती, नम्रता सिन्हा यांनी श्रेय पिक्चर कंपनी द्वारे “सकाळ तर होऊ द्या” या मराठी चित्रपटाची केली आहे. समिट स्टुडिओज आणि मधु शर्मा हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. आजवर हिंदी सिनेसृष्टीत कार्यरत असलेले दिग्दर्शक आलोक जैन यांनी या चित्रपटाद्वारे प्रथमच मराठी सिने क्षेत्रात प्रथमच प्रदार्पण केलेले आहे.

या चित्रपटात सुबोध भावे (अभय)आणि मानसी नाईक(नियती) यांचे दुःख, एकटेपणा आणि त्यानंतर समोर दिसणारे आशेची किरण यावर आधारित मानवाच्या हृदयाला स्पर्श करणारी कहाणी आपल्याला “सकाळ तर होऊ द्या” या नव्या कोऱ्या चित्रपटात पाहायला मिळते.

अभय (सुबोध भावे ) गेल्या एक वर्षापासून प्रत्येकापासून दूर राहत असतो उदास आणि दाटून भरलेले दुःख, तुटलेले मन घेऊन जगत असतो,मग तो आपले जीवन संपविण्याचा निर्णय घेतो. त्याच महत्त्वपूर्ण क्षणी, नशिबाने नियती (मानसी नाईक) त्याच्या आयुष्यात येते -ती एक वेश्या म्हणून काम करीत असते. ती अभयला असे पाऊल उचलण्यापासून रोखते आणि तिथून दोन दुःखी आत्म्यांचा तीव्र भावनिक प्रवास सुरू होतो.जे आपल्या जीवनात आनंदी नसूनही आनंदी असल्याचा भासवून जीवन जगत असतात.

नंतर दोघे अभयाच्या व्हिलामध्ये जातात, जिथे ते त्यांच्या वेदनादायक भूतकाळातील कथा उघडतात. त्यांच्या कथा दुःखाने, संघर्ष आणि पश्चात्तापाने भरलेल्या असतात – परंतु समजूतदारपणाची एक ठिणगी त्यांच्यात पडते आणि नवीन आशा पल्लवीत होऊन त्यांना हळूहळू बरे वाटते.

या चित्रपटात मानवी भावना, एकटेपणा आणि करुणेची शक्ती सुंदरपणे चित्रित केलेली आहे.यात सुबोध भावेची एक दमदार, शक्तिशाली आणि संवेदनशील भूमिका दिसते, तर मानसी नाईक हीची परिपक्वता आणि तोडीची भूमिका दिसून येते. विशेष खोल भावनांनी भरलेल्या भूमिकेत या चित्रपटात ती चमकत आहे.

चित्रपटाची स्क्रिप्ट खूप चांगली लिहिलेली आहे सतत उत्कंठता वाढवते..आपल्याला संपूर्ण व्यस्त ठेवते. पहिल्याच मराठी चित्रपटात दिर्गदर्शक आलोक जैन यांच दिर्गदर्शन खरोखरच प्रभावी आहे – त्यांनी परिपक्वतेने आणि हृदयाने हा विषय हाताळला आहे.एक सर्जनशील निर्माता म्हणून या चित्रपटाची निर्मिती नम्रता सिन्हा यांनी केली आहे.

एकंदरीत, हा एक सुंदर, भावनिक आणि अर्थपूर्ण चित्रपट आहे जो आपल्या हृदयाला स्पर्श करतो आणि तो संपल्यानंतर ही आपल्याबरोबर राहतो .

या चित्रपटातील सुबोध भावे आणि मानसी नाईक या दोन कलावंतांच्या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच खुणवते.यात इतर पात्रे नसताना ही त्यांची कुठे जाणीव वाटत नाही चित्रपट पाहिल्यावर जाणवते कि जीवनात सर्व काही असून ही आनंदावाचून वंचित राहिल्यामुळे जीवन निरर्थक वाटत राहते. इथूनच विचार आणि भाव-भावनांचा एक अनोखा प्रवास सुरू होतो. नायकाने त्याच्या मनात साठवून ठेवलेले जाणण्याचा प्रयत्न नायिका करते. नायक तिला एक काम करायला सांगतो जे ऐकून तिला धक्का बसतो. आणि ती ही त्याला एक काम करायला सांगत असते दोघेही एकमेकांना असे का सांगतात याचे कोडे ‘सकाळ तर होऊ द्या’ हा चित्रपट पाहिल्यावर मिळणार आहेत.
. ‘नाच मोरा…’, आणि ‘जगू दे मला…’ या श्रवणीय गाण्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आजवर कधीही न दिसलेल्या लुकमधील सुबोधची व्यतिरेखा दिसत आहे. मानसीने साकारलेली नियती कुतूहल वाढविणारी छान आहे.
‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाचे संवादलेखन ओंकार बर्वे आणि अंकुश मारोडे यांनी केले असून छायांकन सुनील पटेल यांनी केले आहे. गीतकार अभिषेक खणकर यांनी लिहिलेल्या गीतांना गायक-संगीतकार रोहित राऊत यांनी संगीत दिले आहे. हिमेश रेशमिया मेलोडीज या लेबलखाली या चित्रपटातील गाणी संगीतप्रेमींच्या भेटीला आली आहेत. सिनेपोलीस या चित्रपटाचे वितरक आहेत.चित्रपटाचा एक आगळा वेगळा अनुभव घेण्यासाठी हा चित्रपट नक्की  पाहावा.

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *