ज्येष्ठ लेखक अनिल मधुसूदन कालेलकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन
ज्येष्ठ लेखक अनिल मधुसूदन कालेलकर यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन
अनिल मधुसूदन कालेलकर यांचा जन्म ७ फेब्रुवारी १९४७ रोजी बांद्रा येथे झाला. प्राथमिक शिक्षण दादरमधील छबीलदास हायस्कूलमध्ये, तर पुढील शिक्षण नॅशनल कॉलेज, बांद्रा येथे झाले. ते अविवाहित होते.
आई–वडील :
वडील: मधुसूदन कालेलकर
आई: मीना कालेलकर
कुटुंबात :
• सुनील कालेलकर
• सुधीर कालेलकर
• शिरीष कालेलकर
• जयश्री कालेलकर
त्यांनी आपल्या भाची गौरी कालेलकर चौधरी यांच्या सोबत *‘मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन’* ची स्थापना केली.
अनिलजी दीर्घकाळ साहित्य सहवास, बांद्रा (पूर्व) येथे वास्तव्याला होते.
साहित्यिक आणि कलात्मक कार्य
अनिलजींचे लेखनकार्य अत्यंत बहुआयामी आणि अपूर्व असे होते.
• २५ हून अधिक हिंदी, मराठी आणि गुजराती चित्रपटांचे लेखन
• २५ पेक्षा अधिक हिंदी–मराठी–गुजराती मालिकांचे लेखन
— एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि सातत्याने लेखन करणारे ते एकमेव लेखक.
• १७ मालिकांचे सलग लेखन
— हा दूरदर्शन क्षेत्रातील एक दुर्लभ आणि अभूतपूर्व विक्रम.
• हिंदी व मराठी मिळून १२ सस्पेन्स–थ्रिलर मालिका, आणि प्रत्येकास उल्लेखनीय यश.
• आपल्या कारकिर्दीत ३०० हून अधिक विविध विषयांवर लेखन — आणि प्रत्येक विषयावर तेवढीच प्रभावी मांडणी.
• ‘बंदिनी’, ‘परमवीर’, ‘हॅलो इन्स्पेक्टर’ — या तीनही मालिकांना लागोपाठ तीन वर्षे सर्वोत्कृष्ट मालिकेचे पारितोषिक ही एक विलक्षण हॅटट्रिक.
अनिलजींनी मांडलेले विषय, कथा आणि आशय आज अनेक चॅनल्स ज्या प्रकारे स्वीकारतात, त्या संकल्पना त्यांनी अनेक दशकांपूर्वीच आपल्या लेखणीतून साकारल्या होत्या.
By Sunder M
