प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या ‘‘कैरी” सिनेमाच्या प्रीमियरला मिळाला उत्तम प्रतिसाद
बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट ‘कैरी’ चा प्रीमियर आज मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. प्रीमियरनंतर चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसून आला. प्रभावी कथा, थरारक मांडणी, सुरेल संगीत आणि कोकणच्या निसर्गसौंदर्याने नटलेला सिनेमॅटिक अनुभव यामुळे ‘कैरी’ने प्रेक्षकांच्या मनावर गहिरा ठसा उमटवला आहे.
चित्रपटात सायली संजीव हिने साकारलेली कावेरी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. एक स्त्री जेव्हा हरवलेल्या आयुष्याचा शोध घेत असते, तेव्हा त्या प्रवासात तिला स्वतःचीच ओळख कशी सापडते—हा भावनिक आणि थरारक प्रवास ‘कैरी’ अत्यंत संवेदनशीलतेने आणि प्रभावीपणे मांडतो.
प्रीमियरला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी चित्रपटातील कथानक, पार्श्वसंगीत आणि थरारक ट्रीटमेंटचे विशेष कौतुक केले. सायली संजीवसोबतच शशांक केतकर (आकाश), सिद्धार्थ जाधव (गोपाल), सुबोध भावे (कॅम), सुलभा आर्या (आजी) आणि अरुण नळावडे (आकाशचे वडील) यांनी साकारलेल्या भूमिका कथेला अधिक सशक्त आणि भावस्पर्शी बनवतात.
चित्रपटातील कोकणच्या निसर्गरम्य लोकेशन्स हा ‘कैरी’चा एक स्वतंत्र आकर्षणबिंदू ठरतो. हिरवाईने नटलेली गावं, शांत समुद्रकिनारे आणि निसर्गाच्या कुशीतून उलगडणारा कावेरीचा प्रवास पडद्यावर अत्यंत प्रभावीपणे साकारण्यात आला असून, हा अनुभव प्रेक्षकांना दृश्यात्मक समाधान देतो.
चित्रपटाची सर्जनशील टीम
‘कैरी’ हा चित्रपट नाईन्टी वन फिल्म स्टुडिओज निर्मित असून ए. व्ही. के. पिक्चर्स यांच्या सहकार्याने सादर करण्यात आला आहे.
गीतलेखन मनोज गोलंबरे, तर संगीत निशाद गोलंबरे यांचे आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन शांतनू रोडे यांनी केले असून कथा व पटकथा स्वरा मोकाशी यांनी लिहिली आहे.
मुख्य भूमिकांमध्ये सायली संजीव, सुबोध भावे, शशांक केतकर, सिद्धार्थ जाधव, अरुण नळावडे आणि सुलभा आर्या हे कलाकार झळकणार आहेत.
एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर सावित्री धामी, छायांकन पॅडी, संकलन मणी शिर्के, ऑनलाईन एडिटिंग किरण माद्रे यांचे आहे.
वेशभूषा मृणाल परब, कला दिग्दर्शन केतू, मेकअप व हेअर उर्वशी मेकअप, नृत्य दिग्दर्शन सिद्धेश यांनी केले आहे.
व्हिज्युअल प्रमोशन्स प्रोमोबॉक्स स्टुडिओज, पीआर कार्तिकेय यादव, डिजिटल मार्केटिंग टीम सोशलटाईम, तर पोस्ट-प्रोडक्शन अल्ट्रा स्टुडिओज येथे करण्यात आले आहे.
By Sunder
