Entertainment

‘कन्नी’मधील ‘कधी कशी’ गाणे प्रदर्शित

‘कन्नी’मधील ‘कधी कशी’ गाणे प्रदर्शित

मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन प्रोडक्शन आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहयोगाने ८ मार्चला प्रदर्शित झालेल्या ‘कन्नी’ चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. काही ठिकाणी चित्रपट हाऊसफुल देखील जात आहे. बऱ्याच लोकांनी या चित्रपटाबद्दल चांगला प्रतिक्रिया दिल्या आहे आणि चित्रपटाचे भरभरून कौतुकही केले आहे. या चित्रपटातील सगळीच गाणी प्रेक्षकांना आवडली. आता यातील एक रोमँटिक गाणे सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘कधी कशी’ असे या गाण्याचे बोल असून निधी हेगडे हिने हे सुंदर गाणे गायले आहे. चैतन्य कुलकर्णी यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला एग्नेल रोमन यांनी अप्रतिम संगीत दिले आहे. ऋता दुर्गुळे आणि शुभंकर तावडे यांच्यावर चित्रीत या गाण्यात प्रेम बहारताना दिसत आहे.

YouTube player

या चित्रपटात ऋता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत यांच्यासह शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. मैत्री, प्रेम आणि स्वप्नं यांना जोडून ठेवणाऱ्या ‘कन्नी’ चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन समीर जोशी यांनी केले असून अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी,चित्रपटाचे निर्माते आहेत.

या गाण्याबद्दल दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, ” ‘कधी कशी’ या गाण्यात ऋता आणि शुभंकर या दोघांचे रोमँटिक क्षण दाखवण्यात आले आहेत. हळूवार अशा या गाण्याचे बोलही मनाला स्पर्शून जाणारे आहेत. या चित्रपटातील प्रत्येक गाण्याचा बाज वेगळा आहे.’’

 

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *