Entertainment

‘घबाडकुंड’मध्ये स्मिता पायगुडे अंजुटे यांची रहस्यमयी एन्ट्री!

अनुभवी थिएटर आर्टिस्ट, कुशल मेकअप आर्टिस्ट तसेच ‘आयकॉन दी स्टाईल’च्या संस्थापक सदस्य म्हणून ओळख निर्माण केलेल्या स्मिता पायगुडे अंजुटे यांनी आपल्या कलात्मक प्रवासात अनेक पैलू यशस्वीपणे हाताळले आहेत. आता ‘घबाडकुंड’ चित्रपटाच्या निमित्ताने एका वेगळ्या आणि गूढ भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. निर्माते रसिक कदम आणि दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेतून साकारत असलेला ‘घबाडकुंड’ हा चित्रपट येत्या १९ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘रंगी’ असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. चित्रपटात ब्लॅक मॅजिक करताना दिसणारी ‘रंगी’ आपल्या तीक्ष्ण नजरेने आणि भयावह उपस्थितीने कथानकात वेगळीच रंगत आणताना दिसणार आहे. “नजरेत धग अन् रग हिच्या अंगी, भल्या-भल्यांना घाम फोडते… नाव हिचं रंगी…!” ही टॅगलाईन त्यांच्या व्यक्तिरेखेचं नेमकं वर्णन करते.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना स्मिता सांगतात, ‘घबाडकुंड’मधील ‘रंगी’ ही भूमिका माझ्यासाठी अत्यंत खास आहे. थिएटरमधील अनुभव आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून मिळालेली समज या व्यक्तिरेखेला आकार देताना खूप उपयोगी पडली’. ब्लॅक मॅजिकच्या पार्श्वभूमीवर उभी राहणारी ‘रंगी’ ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना नक्कीच लक्षात राहील, अशा भावना स्मिता पायगुडे अंजुटे यांनी व्यक्त केल्या.

 

 

By Sunder

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *