EntertainmentMarathi

“देऊळ बंद 2” चित्रपटाच्या अभूतपूर्व यशाच्या निमित्ताने दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांनी स्वरूप स्टुडिओस चित्रपट निर्मिती संस्थेला दिली भेट

“देऊळ बंद 2” चित्रपटाच्या अभूतपूर्व यशाच्या निमित्ताने ठाणे येथील विविध भेटीगाठी दरम्यान सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांनी स्वरूप स्टुडिओस या चित्रपट निर्मिती संस्थेला भेट दिली. ही भेट स्वरूप स्टुडिओस सोबतच्या पुढील चित्रपटाच्या निमित्ताने होती.
याप्रसंगी अभिनेता अंकुश चौधरी स्वरूप स्टुडिओसचे सचिन नारकर, विकास पवार यांनी चित्रपटाला मिळालेल्या उदंड प्रतिसादाचे कौतुक म्हणून खास प्रवीण विठ्ठल तरडे याच्या हस्ते केक कापून हा आनंद सोहळा साजरा केला.

“देऊळबंद 2” चा सक्सेस हा संपूर्ण इंडस्ट्री साजरा करते आहे याचा मला आनंद असून चित्रपटाला मिळालेला स्वामींचा हा आशीर्वाद असल्याचे प्रवीण विठ्ठल तरडे यांनी
आवर्जून नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *