लवकरच विवाहबंधनात अडकणार अभिनेता निखिल चव्हाण आणि अभिनेत्री अनुष्का सरकटे
लवकरच विवाहबंधनात अडकणार अभिनेता निखिल चव्हाण आणि अभिनेत्री अनुष्का सरकटे यांच्यासाठी अभिनेते भरत जाधव, सुधीर निंबाळकर यांच्या कुटुंबीयांनी खास केळवणाचे आयोजन केले.
यावेळी कमलाकर सातपुते, शर्मिला शिंदे उपस्थित होते. आगामी आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव करत पार पडलेल्या या खास भेटीत आनंद, आपुलकी आणि कौटुंबिक स्नेहाची सुंदर झलक पाहायला मिळाली.
