EntertainmentMarathi

“तुला पाहता” चित्रपटात अभिनेता आणि पार्श्वगायक म्हणून झळकणार

आजवर अनेक रिऍलिटी शोच्या माध्यमातून आपल्या सुमधुर आवाजाने घराघरात पोहचलेला नचिकेत लेले आता आपली एक वेगळी इनिंग सुरु करण्यासाठी सज्ज झाला आहे. ब्रेव्ह व्हील प्रॉडक्शन्सच्या मयूरा प्रधान यांची निर्मीती असलेल्या, आगामी ‘तुला पाहता’ या चित्रपटाच्या निमित्ताने नचिकेत हा अभिनेता आणि चित्रपटाचा पार्श्वगायक म्हणून पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या १० जुलैला “तुला पाहता” हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे.

“तुला पाहता” चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन मयूरा प्रधान यांचंच आहे. पुष्कर झोटिंग यांनी छायांकन, रोहित प्रधान यांनी ध्वनि आरेखन, रोहन प्रधान, रोहन गोखले यांनी संगीत दिग्दर्शन, तर दीपाली विचारे यांनी नृत्य दिग्दर्शनाद्वारे साथ दिली आहे. चित्रपटात सतीश पुळेकर, इला भाटे यांच्यासह नचिकेत लेले, मानसी पाटील, निशिगंधा वाड, आनंद काळे, दीपाली विचारे, पल्लवी अजय, स्वप्नील परजाणे, आकाश शिंदे अशी उत्तम स्टारकास्ट आहे. नव्या-जुन्या पिढीच्या कलाकारांचा दर्जेदार अभिनय या चित्रपटातून पाहता येणार आहे.

मनाला भुरळ घालणाऱ्या या चित्रपटातील “दूर दूर” हे गाणं सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. नचिकेत लेले आणि सई गोडबोले यांच्या सुमधुर आवाजत स्वरबद्ध करण्यात आल असून संगीतकार रोहन-रोहन या जोडीने या गीताला संगीत दिले आहे. संगीतकार रोहन गोखले याने हे गीत लिहीले असून गीतकार म्हणून त्याचे ही या चित्रपटाच्या निमित्ताने पदार्पण आहे.”तुला पाहता” हा चित्रपट माझ्यासाठी खरंच लकी आहे. करिअर मधील पहिल्याच चित्रपटात मुख्य नायक आणि पार्श्वगायक अशा दोन्ही महत्वपूर्ण भूमिका मला साकारण्याची संधी मला दिल्याबद्दल मी या चित्रपटाच्या लेखिका, दिग्दर्शिका आणि निर्मात्या मयूरा प्रधान यांचे मनापासून आभार मानतो असे अभिनेता, पार्श्वगायक नचिकेत लेले याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *