EntertainmentMarathi

रिअल ते रील… ‘द्विधा’ मध्ये झळकणार मानसी कुलकर्णी आणि तिची लेक !

मराठी चित्रपटसृष्टीत कलाकारांच्या पुढच्या पिढीबद्दल प्रेक्षकांना नेहमीच विशेष आकर्षण असते. अशाच एका खास योगायोगामुळे आगामी मराठी चित्रपट ‘द्विधा’ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटात अभिनेत्री मानसी कुलकर्णी यांनी साकारलेल्या ‘श्रावणी’ या मध्यवर्ती व्यक्तिरेखेच्या बालपणीच्या भूमिकेत तिची कन्या ओवी दिसणार आहे. ‘द्विधा’ चित्रपटाच्या निमित्ताने ही मायलेकीची जोडी एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. विशेष म्हणजे, ओवीचा मोठ्या पडद्यावरचा हा पहिलाच ‘ऑनस्क्रीन’ प्रयत्न असूनही तिने आत्मविश्वास, आणि निरागसतेने ही भूमिका साकारत सर्वांची दाद मिळवली आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन निलेश भास्कर नाईक यांनी केले असून निर्माती विदुला रमेश आजगावकर आहेत. येत्या २१ ऑगस्टला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

याविषयी अभिनेत्री मानसी कुलकर्णीने सांगितलं,‘श्रावणीच्या बालपणीच्या भूमिकेसाठी ओवीची निवड हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक क्षण होता. आई म्हणून तिचा पहिला ऑनस्क्रीन प्रवास पाहताना अभिमान वाटत होता, सोबत तिच्या अभिनयातील सहजता आणि आत्मविश्वास पाहून iसमाधान मिळालं. तिने ही भूमिका मनापासून आणि अत्यंत प्रामाणिकपणे साकारली आहे.’

पहिल्याच अभिनय अनुभवाबद्दल ओवी म्हणाली, ‘सुरुवातीला थोडी भीती वाटत होती, पण आई आणि संपूर्ण टीमने मला खूप प्रोत्साहन दिलं. त्यामुळे मी ही भूमिका आत्मविश्वासाने करू शकले. ‘द्विधा’मधून प्रेक्षकांसमोर येण्याची संधी मिळाल्याचा मला खूप आनंद आहे.’

‘द्विधा’ हा केवळ बाप-लेकीच्या नात्यावर आधारित चित्रपट नसून, प्रत्येक नात्यातील प्रेम,विश्वास आणि भावभावनांचा हळवा प्रवास संवेदनशीलतेने मांडणारा चित्रपट आहे. या दोघींसोबत सतीश पुळेकर, रेणुका दफ्तरदार, आस्ताद काळे, तन्वी कुलकर्णी, पुष्कर सराड, मनोज कोल्हटकर, भूषण कडू, प्रफुल्ल सावंत, हेमांगी वेळणकर आणि यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका चित्रपटात आहेत.

 

By Sunder

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *