EntertainmentMarathi

निर्माता-दिग्दर्शक रॉक कच्चीच ‘तांबडी चांबडी’ नंतर ‘नाच ना’ हे नवीन गाणं प्रदर्शित, जगभरात गाणं तुफान व्हायरल

संगीताला भाषेच्या आणि देशाच्या सीमा नसतात, याचा प्रत्यय देणारं ‘नाच ना’ हे दमदार टेक ट्रायबल गाणं आता नुकतच रसिकांच्या भेटीला आलं आहे. मेक्सिकोचा इलेक्ट्रॉनिक संगीत कलाकार फ्रीबोट (FREEBOT) आणि महाराष्ट्राचा मराठी कलाकार स्वॅगरबॉय (SWAGER BOY) यांचं हे आंतरराष्ट्रीय कोलॅब “वर्ल्ड ऑफ वाईब्स” रेकॉर्ड प्रस्तुत करत आहेत. या गाण्याची निर्मिती कोल्हापूरच्या रॉक कच्ची यांनी केली आहे. ते “वर्ल्ड ऑफ वाईब्स” या संगीत रेकॉर्ड लेबलचे संस्थापक आहेत. या गाण्याचं दिग्दर्शन झाहिद सय्यद याने केलं आहे. अभिनेत्री एकता, अभिनेता रॉक कच्ची आणि रॅपर स्वॅगर बॉय हे कलाकार या गाण्यात आहेत. मराठी, हिंदी आणि स्पॅनिश या तीन भाषांचा संगम, इलेक्ट्रॉनिक संगीताचा उत्साह आणि महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली संगीताची ओळख यामुळे ‘नाच ना’ हे गाणं विशेष ठरत आहे. या गाण्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संगीताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

‘नाच ना’ या गाण्याची संकल्पना फ्रीबोट यांच्या भारत दौऱ्यादरम्यान आकाराला आली. वर्ल्ड ऑफ वाईब्सच्या माध्यमातून सुरू झालेल्या या प्रवासात महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या टेक ट्रायबल संगीताच्या शैलीवर आधारित काहीतरी वेगळे करण्याचा विचार पुढे आला. या बीटवर स्वॅगर बॉयची शैली उत्तम प्रकारे खुलून येईल, असा विश्वास रॉक कच्ची यांना वाटला आणि अवघ्या एक-दोन दिवसांत स्वॅगर बॉयने गाणे तयार केले. या गाण्यासाठी काही मोठ्या म्युझिक लेबल्सकडूनही रस दाखवण्यात आला; मात्र गाण्याची बीट बदलून ते हिंदीमध्ये सादर करण्याच्या सूचना आल्याने वर्ल्ड ऑफ वाईब्सने गाण्याची मराठी ओळख कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. अनेक अडचणी आणि प्रायोजकांकडून नकार मिळाल्यानंतर रॉक कच्ची आणि वर्ल्ड ऑफ वाईब्सने स्वतःची गुंतवणूक करून या गाण्याची निर्मिती आणि म्युझिक व्हिडिओ पूर्ण केला. या प्रकल्पात रॉक कच्ची यांनी सेकंडरी प्रोड्युसर, लेखक आणि सहदिग्दर्शक म्हणून काम पाहिले असून, झाहिद सय्यद यांनी दिग्दर्शन आणि सिनेमॅटोग्राफी केली आहे. यापूर्वी स्वॅगरबॉय आणि वाय डी यांच्या ‘माझ्या सोन्या’ या गाण्याच्या व्हिडिओसाठीही झाहिद सय्यद यांनी काम केले होते.

निर्माता व दिग्दर्शक रॉक कच्ची ‘नाच ना’ गाण्याविषयी सांगतो, ”मी या आधी संगीतकार क्रेटेक्स सोबत ‘तांबडी चांबडी’ गाण केल होत. ते इंटरनॅशनल रेकॉर्ड लेबलला गेलेल सर्वात पहील भारतीय मराठी गाण आहे. नुकतच मी रॅपर स्वॅगर बॉय व मेक्सिकन आर्टिस्ट फ्रीबोट यांना घेऊन ‘नाच ना’ गाण केल आहे. ‘नाच ना’ हे केवळ एक गाण नसून महाराष्ट्राच्या प्रादेशिक संगीताला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या दिशेने टाकलेल महत्त्वपूर्ण पाऊल आहे. स्वॅगरबॉयचे संगीत, गीतलेखन आणि गायन यांसोबत फ्रीबोट यांच्या मेक्सिकन इलेक्ट्रॉनिक संगीताचा प्रभाव या गाण्यात अनुभवायला मिळणार आहे. हे गाण महाराष्ट्राच्या सांगीतिक संस्कृतीला आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक संगीतविश्वाशी जोडण्याचा प्रयत्न करतो. मराठी भाषेचा आणि स्थानिक संगीताचा अभिमान जपत जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा संदेश देणारे ‘नाच ना’ हे गाणे डिजिटल प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालेल अशी मी आशा करतो. महाराष्ट्राच्या मातीतून मेक्सिकोपर्यंत पोहोचणारा हा सांगीतिक प्रवास महाराष्ट्राच्या संगीतासाठी एका नव्या आंतरराष्ट्रीय अध्यायाची सुरुवात ठरण्याची अपेक्षा आहे.”

माझ्या सोन्या हे हिट गाण दिल्यानंतर रॅपर स्वॅगर बॉय ‘नाच ना’ या त्याच्या नवीन गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगतो, “माझ्या सोन्या गाण्याला तुम्ही खूप छान सपोर्ट केलात. आता मी तुमच्यासाठी महाराष्ट्रीयन आणि मेक्सिकन स्टाईलमध्ये अस मराठी गाण घेऊन आलो आहे. खर तर मी रॉक दादाचे आभार मानतो की त्याने या गाण्याची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. मेक्सिकन आर्टिस्ट जेव्हा भारतात आला. तेव्हा रॉक दादाने त्याच्यासोबत गाण करण्यासाठी विचारलं. आणि फ्रीबोट देखील या गाण्यासाठी तयार झाला. आम्ही नाच ना गाण पुण्यात शूट केल आहे. माझ्यासाठी हे गाण म्हणजे स्वप्नवत आहे. तसेच हे गाण सोशल मीडियावर सध्या ट्रेंडींगला आहे. माझ्या सर्व गाण्यांना प्रेक्षकांचं असच प्रेम मिळूदे अशी मी आशा व्यक्त करतो. छान छान रील व्हिडिओ बनवा आणि आम्हाला टॅग नक्की करा.”

YouTube player

 

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *