EntertainmentMarathi

मनिष शिंदे यांचा “धाराऊ” चित्रपट , चंबळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात “सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म” पुरस्काराने सन्मानित

“धाराऊ… ती गाय नाय… माय हाय!” या चित्रपटाची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पुणे, बुलढाणा, लातूर, परभणी तसेच विदर्भ – मराठवाड्यात या चित्रपटाचे शोज हाऊसफुल्ल होत आहेत. दिग्दर्शक मनिष शिंदे यांचा हा चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेला पहिलाच चित्रपट, शिवाय यात एक ही मोठा स्टार नाही सगळे गावागावातले नवनवीन कलाकार आहेत.

मेहनत, जिद्द आणि स्वप्नांच्या बळावर दिग्दर्शक मनिष शिंदे यांनी धाराऊ चित्रपट प्रदर्शित केला. त्यांच्यासोबत अनेक मराठी चित्रपट असले तरी ही त्यांच्या चित्रपटाच्या वेगळ्या कथानकामुळे त्यांना अनेक स्क्रीन मिळाले आहेत. हे यश चित्रपटाच्या दिग्दर्शकासोबत चित्रपटाच्या संपूर्ण टीमच देखील आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, धाराऊ या चित्रपटाला चंबळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात “सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म” पुरस्कार देण्यात आला आहे. या आधी या चित्रपटाला तब्बल २६ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. विशेष म्हणजे पाकिस्तानातील पेशावर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बेस्ट डेब्यू फीचर फिल्म’ पुरस्कार देखील मिळाला आहे.

दिग्दर्शक मनिष सुरेश शिंदे पुरस्काराविषयी सांगतात, “गौमातेवर आधारित असणारा मराठीतला पहिलाच चित्रपट ‘धाराऊ’ आहे. या आधी मी २५ हून अधिक संगीत अल्बम, टेलीविज़न ॲड्स केल्या आहेत. दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट करताना मनात दडपण होत पण जिद्द होती. आणि गौमतेप्रती माझी श्रद्धा होती. त्यामुळे सगळच व्यवस्थित जुळून आल. चित्रपट थिएटर मध्ये हाऊसफुल्ल सुरू असताना चंबळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात “सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म” पुरस्कार मिळाला. त्यामुळे माझा आनंद द्विगुणीत झाला आहे. सर्व प्रेक्षकांचं आपल्या कलेप्रती प्रेम व कौतुक मिळत आहे. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी एकदा तरी ‘धाराऊ’ हा चित्रपट थिएटर मध्ये जाऊन पहावा आणि आम्हाला प्रतिक्रिया कळवाव्यात.”

https://in.bookmyshow.com/movies/pune/dharau-marathi/ET00523382

 

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *