EntertainmentMarathi

मराठी दिग्दर्शक सचिन धोत्रे यांचे मोठे सामाजिक पाऊल’मिरांडा वॉर्निंग’ चित्रपटाचा संपूर्ण नफा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देणार

मराठी चित्रपटसृष्टीतील सस्पेन्स क्राईम थ्रिलर ‘मिरांडा वॉर्निंग’ हा चित्रपट ट्रेलरमुळे चांगलाच चर्चेत असून केवळ आपल्या थरारक कथेमुळेच नव्हे, तर एका अत्यंत संवेदनशील आणि प्रेरणादायी निर्णयामुळेदेखील चर्चेत आला आहे. या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक सचिन धोत्रे यांनी चित्रपटातून मिळणारा संपूर्ण नफा राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली असून येत्या २७ नोव्हेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास आता सज्ज झाला आहे.

सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांत दुष्काळाचे सावट असून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक संकटात आहेत. समाजाप्रती असलेली कृतज्ञता आणि बांधिलकी जपण्यासाठी दिग्दर्शक सचिन धोत्रे यांनी हा स्तुत्य पुढाकार घेतला आहे. केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता, कलेच्या माध्यमातून थेट सामाजिक प्रश्नांना हातभार लावण्यासाठी मी हा निर्णय घेतल्याचे चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक सचिन धोत्रे यांनी सांगितले.

सतनाम फिल्म्स स्टुडिओ आणि ओपन गेट मुव्हीज मार्फत “मिरांडा वॉर्निंग” या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. सचिन धोत्रे यांनी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे तर अल्ट्रा मीडिया एंटरटेनमेंटच्या सुशीलकुमार अग्रवाल आणि सुकल्प चित्रच्या कल्पक जोशी यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. सचिन धोत्रे यांनी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. रवींद्र मठाधिकारी, सायली मठाधिकारी यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. अभिनेता आदिनाथ कोठारे, जान्हवी किल्लेकर, पायल जाधव, सुरेश विश्वकर्मा, वैभव चव्हाण, इरिना राय, एकनाथ गीते, त्रिशा, निलेश गवारे, इम्रान तांबोळी या कलाकारांचा दमदार अभिनय आपल्याला या चित्रपटातून पहायला मिळणार आहे.

 

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *