Saturday, April 19, 2025
Latest:
EntertainmentMarathi

तू भेटशी नव्याने मालिकेत सुबोध आणि शिवानीचा हटके लूक,नव्वदीचा नॉस्टेल्जीया*

तू भेटशी नव्याने मालिकेत सुबोध आणि शिवानीचा हटके लूक*
*नव्वदीचा नॉस्टेल्जीया

९० चं दशक म्हणजे मंतरलेला काळ होता. नव्वदीचे दशक फॅशन,सौंदर्य, टेलिव्हिजनसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण संक्रमणाचा कालखंड होता. अनेक क्षेत्रांत आमूलाग्र बदल होत होते. आजही त्या आठवणी अनेकांसाठी ताज्या आहेत. नव्वदीच्या दशकातील हा काळ आता सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेतून आपल्याला अनुभवायला मिळणार आहे.

नव्वदीचे दशक फॅशन आणि सौंदर्य ट्रेंडचा एक महत्त्वपूर्ण कालखंड ठरला. या काळातील बरेच ट्रेंड सामान्य लोकांमध्ये लोकप्रिय झाले. बॉलिवूड सेलिब्रिटींनी सेट केलेल्या ट्रेंडला या काळात चांगली लोकप्रियता मिळाली. सोनी मराठी वाहिनीने या ट्रेंड चा अभ्यास करत त्याकाळातील फॅशन ट्रेंड ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेतून पुन्हा आणण्याचा प्रयत्न केला आहे.

सुबोध भावे हा अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक. त्यांनी साकारलेल्या भूमिकांचं नेहमीच कौतुक झाल्याचे पहायला मिळाले आहे. एखादी व्यक्तिरेखा अविस्मरणीय कशी करायची? हे या अभिनेत्याने वेळोवेळी दाखवून दिले आहे. आता ते पुन्हा नव्या लुकमुळे चर्चेत आहेत ‘तू भेटशी नव्याने’ या शीर्षकाप्रमाणेच एका नव्या रूपात आपल्याला सुबोध भावे आणि शिवानी सोनार ही जोडी दिसणार आहे. ही मालिका येत्या ८ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर रात्री ९.००वा. आपल्या भेटीला येणार आहे. ‘तू भेटशी नव्याने’ या सोनी मराठी वाहिनीवरील मालिकेच्या माध्यमातून ही जोडी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.

सुबोध आणि शिवानी यांच्या खास लूकची पहिली झलक समोर आल्यावर चाहत्यांना त्यांचा अनोखा अंदाज चांगलाच भावल्याचे दिसून येत आहे. नव्वदीच्या दशकातील त्यांचा हटके लूक चर्चेचा विषय ठरलाय. ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेच्या निमित्ताने प्रथमच दोन वेगळ्या काळातल्या भूमिका आणि नव्वदीच्या काळातील नॉस्टेल्जीया अनुभवायला मजा येणार असल्याचे हे दोघे सांगतात. या मालिकेत पहिल्यांदाच AI चा वापर केला आहे. AI चा वापर करून ह्या मालिकेतील व्यक्तिरेखा साकारली जाणार असल्याने ‘तू भेटशी नव्याने’ ह्या मालिकेच्या प्रोमो नंतर या मालिकेविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर आहेत.

येत्या ८ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर रात्री ९. ०० वा. सुरु होणारी ‘तू भेटशी नव्याने’ही मालिका नक्की पहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *