EntertainmentMarathi

“मनमौजी” चित्रपटातून उलगडणार नात्यांची रंजक गोष्ट

“मनमौजी” चित्रपटातून उलगडणार नात्यांची रंजक गोष्ट*

येतोय नोव्हेंबरमध्ये,भूषण पाटील, सायली संजीव यांची मुख्य भूमिका

प्रत्येक मुलीला आपला जोडीदार हा स्मार्ट, हॅंडसम, डॅशिंग असावा अशी अपेक्षा असते. अशाच एका तरुणाची गोष्ट आगामी “मनमौजी” या चित्रपटातून उलगडणार आहे. प्रत्येक स्त्रीला हवा-हवासा वाटणाऱ्या या तरुणाच्या मनात स्त्रियांबद्दल

राग असतो.कोणतीच स्त्री त्याला आवडत नसते. नात्यांचे अनेक मानसिक, भावनिक पदर असलेला हा चित्रपट येत्या नोव्हेंबर मध्ये प्रदर्शित होत असून, चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.

गुलाबजाम, लॉस्ट अँड फाऊंड अशा चित्रपटांची निर्मिती केलेल्या गोल्डन गेट मोशन पिक्चर्सच्या विनोद मलगेवार यांनी “मनमौजी” चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन शीतल शेट्टी यांचे असून हृषिकेश जोशी यांनी संवाद लेखन केले आहे. प्रसाद भेंडे यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले आहे.क्षितिज पटवर्धन आणि वलय मुळगुंद यांनी गीतलेखन, अमितराज यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात अभिनेता भूषण पाटील अभिनेत्री सायली संजीव, सिनेसृष्टीत प्रथमच पदार्पण करणारी रिया नलावडे, जयवंत वाडकर, अरुण नलावडे, भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. फिल्मास्त्र स्टुडिओज ह्या चित्रपटाचे वितरक म्हणून काम पाहणार आहे.

“मनमौजी” नावावरून चित्रपटाच्या कथानकाचा अंदाज येत नाही. चित्रपटाचं पोस्टर अतिशय फ्रेश आणि युथफुल आहे. मात्र ह्या हॅंडसम तरुणाच्या मनात स्त्रियांबद्दल राग का असतो ? तो शांत होतो का? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला अजून थोडी वाट पहावी लागणार आहे.

YouTube player

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *