EntertainmentMarathi

बॉलिवुड मध्ये पुन्हा सईच्या अभिनयाची छाप ! ग्राउंड झीरो मध्ये सईची खास भूमिका !

बॉलिवुड मध्ये पुन्हा सईच्या अभिनयाची छाप !

ग्राउंड झीरो मध्ये सईची खास भूमिका !

फॅशन आणि वैविध्यपूर्ण भूमिका मुळे कायम चर्चेत असलेली सई ताम्हणकर पुन्हा एकदा बॉलिवुड प्रेक्षकांना भुरळ घण्यासाठी सज्ज झाली आहे. सई ग्राउंड झीरो या चित्रपटात दिसणार आहे ती इमरान हाश्मी सोबत स्क्रीन स्पेस शेयर करणार आहे. ग्राउंड झीरो चा ट्रेलर नुकताच लाँच झाला आणि सईच्या सातत्यपूर्ण अभिनयाची पुन्हा एकदा झलक यातून बघायला मिळाली.

ग्राउंड झीरो हा चित्रपट येत्या २५ एप्रिल ला प्रदर्शित होणार असून सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे.ग्राउंड झिरो’ हा चित्रपट २००१ मध्ये दिल्लीतील संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या सिक्रेट मिशनवर हा सिनेमा आधारित आहे. सोशल मीडिया वर या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर व्हायरल होताना दिसतोय.

सई ग्राउंड झीरो मध्ये बीएसएफ जवान नरेंद्र दुबे यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. ही फक्त एका बायकोची भूमिका असली तरी जवानाच्या बायकोचा त्याला असलेला खंबीर पाठिंबा यातून बघायला मिळणार आहे. सईने बॉलिवुड मध्ये आजवर अनेक सशक्त भूमिका साकारल्या आणि त्या तितक्याच ताकदीने साकारल्या.

यंदाच वर्ष सई साठी बॉलिवूडमय तर आहे पण मराठी आणि बॉलिवुड मध्ये सातत्यपूर्ण काम करणारी अभिनेत्री म्हणून सईची नवी ओळख संपादन झाली आहे. सई बॉलिवूड सोबत मराठीत देखील तितकच दमदार काम करताना दिसतेय.

येणाऱ्या काळात सई देवमाणूस चित्रपटात पहिल्यांदा लावणी वर थिरकताना दिसणार असून तिच्या चाहत्यांना ही एक पर्वणी आहे. सोबतीला गुलकंद, मटका किंग मध्ये सई दिसणार आहे.

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *