EntertainmentMarathi

मेघा घाडगेच्या संकल्पनेतून “संगीत बारी ते वारी”

कुटुंबासमवेत पहाण्याजोगे बारी ते वारीचा अर्थ समजवणारे संगीत नाटक “संगीत बारी ते वारी

महाराष्ट्राच्या लोककलेत खोलवर रुजलेली बारी आणि वारीची परंपरा आता रंगभूमीवर नव्या रुपात अनुभवायला मिळणार आहे. ‘संगीत बारी ते वारी’ हे नवे संगीतमय नाटक रसिक प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय मेजवानी ठरणार आहे. या नाटकात वारीची भक्तीभावाची झलक, लोककलेचा ठसा, तसेच जीवनातील संघर्ष आणि आनंद यांचे अप्रतिम चित्रण पाहायला मिळणार आहे. गायन, वादन, नृत्य आणि नाटक यांचा संगम घडवणारे हे प्रयोग प्रेक्षकांना रंगतदार अनुभव देणार आहेत.

मेघा वि.रा.एंटरटेनमेंट निर्मित ‘संगीत बारी ते वारी ‘ या नाटकाची संकल्पना मेघा घाडगे यांची असून या नाटकाचे लेखन नचिकेत दांडेकर यांनी केलं आहे. नाटकाचे दिग्दर्शन संकेत पाटील यांनी केली आहे. नृत्यदिग्दर्शन योगेश देशमुख यांचे असून, संगीताची जबाबदारी आशुतोष वाघमारे यांनी सांभाळली आहे. आणि गीते अनिकेत कदम यांची आहेत. नेपथ्य देवाशिष भरवडे, प्रकाशयोजना कुलभूषण देसाई आणि प्रणाली, मेघा, प्रज्ञश्री यांनी केलेल्या वेशभूषेचा अप्रतिम मिलाफ या नाटकात अनुभवायला मिळणार आहे.

मराठी मनोरंजन विश्वातील लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे मुख्य भूमिका साकारणार आहे.त्यांच्या सोबत संजना पाटील,शिरीष पवार,विद्याधर नामपल्ले आणि इतर कलाकारही या नाटकात आहेत.सप्तसुर म्युझिक चॅनल म्युझिक पार्टनर आहे. खुशबू जाधव या नाटकाच्या सहनिर्माती असून आगामी काळात महाराष्ट्रभर हे नाटक रसिकांसमोर येणार आहे. लोककलेची परंपरा रंगभूमीवर नेणारे हे नाटक नक्कीच प्रेक्षकांच्या मनात घर करून राहील, असा विश्वास या नाटकाचे निर्माती मेघा घाडगे व्यक्त करतात.

 

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *