EntertainmentMarathi

भय आणि भ्रमाच्या विळख्यातला थरार ‘सालबर्डी’

इतिहासाच्या गर्भात दडलेल्या अनेक रहस्यांचा कधीच शोध लागत नाही, ती नेहमीच अनुत्तरीतच रहातात. काहींचा शोध घेताना ती अजून वेगळया रहस्यांना जन्म देतात. महाराष्ट्रातल्या दुर्गम भागात असलेल्या ‘सालबर्डी’ या गावातल्या अशाच एका रहस्याचा आणि तिथे घडणाऱ्या विचित्र घटनांच्या शोधाची कहाणी सांगणारा ‘सालबर्डी’ हा थरारपट एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नेब्यूला फिल्म्स निर्मित ‘सालबर्डी’ चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ.गजानन जाधव, राम जाधव यांनी केली आहे. रमेश साहेबराव चौधरी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. ‘सालबर्डी’ चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या पोस्टरमधून या चित्रपटाच्या विषयाची भीषणता अधोरेखित होत आहे. या गावात घडणाऱ्या रहस्यमय घटनांचा तपास आणि त्या तपासाअंती बाहेर येणारं काळकभिन्न वास्तव हा या चित्रपटाचा गाभा आहे.
भय आणि भ्रमाच्या विळख्यातल्या अनपेक्षित घटनेमागच्या शोधाचे ‘रहस्य’ शोधताना काय होणार? हे सत्य कोण आणि कसं बाहेर काढणार? हे पहाणं अतिशय थरारक असणार आहे. भीती, थरार, विश्वास-अविश्वास यांचा अकल्पित अनुभव देणाऱ्या ‘सालबर्डी’ चित्रपटात मराठीतल्या उत्तम कलाकारांची मांदियाळी आहे. हे कलाकार कोण? हे अजून गुलदस्त्यात आहे.

‘सालबर्डी’ चित्रपटाचे छायांकन आणि संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. पटकथा आणि संवाद रोहित शुक्रे यांचे आहेत. गुरु ठाकूर, मुकुंद भालेराव यांनी लिहिलेल्या गीतांना पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत लाभले आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी अमर मोहिले यांनी सांभाळली आहे. अजय गोगावले, जावेद अली, आनंदी जोशी या गायकांचा स्वरसाज चित्रपटाला लाभला आहे. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर, आशीष पाटील यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते दिपक कुदळे पाटील आहेत. वेशभूषा प्रणिता चिंदगे तर रंगभूषा श्रीनिवास मेनूगे यांची आहे. कलादिग्दर्शन प्रदीप गुरव यांचे आहे.

 

 

By Sunder

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *