Uncategorized

बिग बॉस फेम “आयुष संजीव” आणि अभिनेत्री “हेमल इंगळे” यांची नवी जोडी “तुरु तुरू” गाण्यासाठी एकत्र, गाण्याने दोनच दिवसात १ मिलियन व्ह्यूज पूर्ण

कृष्ण मुरारी, सुंदरा, दर्याचं पाणी, लई भारी दिसते पोर तसेच आता नुकतच आलेलं गायिका सई गोडबोलेच्या सुमधुर आवाजातील साईरत्न एंटरटेनमेंट प्रॉडक्शनची निर्मिती असलेलं “तुरु तुरू” गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून हे गाणं तब्बल दोन दिवसात १ मिलियन व्ह्यूज पार गेलं आहे. या गाण्याला सोशल मीडियावर लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या गाण्यात बिग बॉस फेम अभिनेता आयुष संजीव आणि अभिनेत्री हेमल इंगळे आहेत. तसेच गायिका सई गोडबोले व गायक निहार शेंबेकर आणि शार्क यांनी हे गाणं गायलं आहे. विकास साटम हे या गाण्याचे गीतकार आहेत. तेजस नेरुरकरच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार निहार शेंबेकर आणि शार्क यांनी संगीत दिलं आहे. पूजा काळेने या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे.

अभिनेत्री हेमल इंगळे गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगते, “मी साईरत्न एंटरटेनमेंटचे मनापासून आभार मानते की त्यांनी मला या गाण्यात काम करण्याची संधी दिली. माझी प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही या गाण्याला भरभरून प्रेम द्या. या गाण्याचे दोन दिवसात एक मिलियन व्ह्यूज पूर्ण झाले आहेत. त्यामुळे मी सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार मानते. या गाण्यावर सुंदर रील व्हिडिओ बनवा. आणि मला जरूर टॅग करा.”

गायक व संगीतकार निहार शेंबेकर या गाण्याच्या रेकॉर्डिंग विषयी सांगतात, “मराठीतलं हे पहिलंच गाणं आहे जे
आफ्रिकन रीदम मधील बायले फंक या जॉनरवर केलं गेलं आहे. तसेच तुम्हाला गाणं बघताना असंच वाटेल की हेमल खरंच गात आहे. हेमलला सईचा आवाज परफेक्ट मॅच झाला. मला खात्री आहे की तुम्हालाही हे गाणं खूप आवडेल. तुम्ही थिरकणार आहात या गाण्यावर. तुम्हाला हे गाण कस वाटल हे आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा.”

YouTube player

 

 

By Sunder

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *