जिओ स्टुडिओज् आणि वरुण नार्वेकर यांच्या “एक दोन तीन चार” चित्रपटाचं पहिलं गाणं “गुगली” आज झाले रिलीज !!!
जिओ स्टुडिओज् आणि वरुण नार्वेकर यांच्या “एक दोन तीन चार” चित्रपटाचं पहिलं गाणं “गुगली” आज झाले रिलीज !!!
निपुण धर्माधिकारी आणि वैदेही परशुरामी ही आगळीवेगळी जोडी पहिल्यांदाच मुरांबा फेम दिग्दर्शक वरुण नार्वेकरच्या “एक दोन तीन चार” या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. आज या चित्रपटाचे ” गुगली” हे पहिले गाणे रिलीज करण्यात आले असून, हे गाणे जणू तरुण पिढीला गुगली गुगली गुगली , पडली का? उडले उडले स्टंप का? म्हणत आव्हान देतय अस जाणवतंय.
म्हणतात ना प्रेमात विकेट पडते तसच काही झालय सम्या आणि सायलीच्या आयुष्यात. इथे विकेट नव्हे तर दोघांचीही गुगली पडली आहे. गाण्यात दोघांच्या कॉलेज मधील पहिल्या भेटी पासून ते त्यांची गोड चहा डेट, रोज डे सेलिब्रेशन, प्रपोज ते लग्न असा एकंदरीत गोड प्रवास हया गाण्यात दाखवण्यात आला आहे.
“गुगली” ह्या अप्रतिम गाण्याला टी (TEA) ह्यांनी आपला आवाज दिला आहे. तर संगीत दिग्दर्शन सौरभ भालेराव ह्यांनी केलं आहे. गाण्याचे बोल अक्षय राजे शिंदे ह्यांनी लिहिले आहेत, जे अगदी मनात बसेल असं आहे.
“एक दोन तीन चार” ह्या चित्रपटात निपुण धर्माधिकारी आणि वैदेही परशुरामी सोबतच इतर दमदार कलाकार जसे मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर आणि करण सोनवणे हे कलाकार असणार आहेत. त्यामुळे चित्रपटाची उत्सुकता वाढणार नक्कीच!

चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद निपुण धर्माधिकारी आणि वरुण नार्वेकर यांची आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तूत, या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे, रणजित गुगळे, केयूर गोडसे, निपुण धर्माधिकारी आणि नीरज बिनीवाले यांच्या बहावा एन्टरटेन्मेंट आणि १६ बाय ६४ यांनी केली आहे.
तर एंटरटेनमेंट नि भरपूर अश्या युनिक प्रेमाच्या कहाणीचा प्रवास अनुभवायला सज्ज व्हा! “एक दोन तीन चार” १९ जुलैला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शनास सज्ज.