EntertainmentMarathi

अर्जुन-सावीला मिळाले प्रेक्षकांचे भरभरून प्रेम, ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’चा ४०० भागांचा टप्पा पार

अर्जुन-सावीला मिळाले प्रेक्षकांचे भरभरून प्रेम, ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’चा ४०० भागांचा टप्पा पार

कलर्स मराठीवरील ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. ही मालिका घराघरात पोहोचली असून सगळे कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. प्रेक्षक या सगळ्यांवरच भरभरून प्रेम करत आहेत. या प्रेमामुळेच आज ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेने ४०० भागांचा टप्पा गाठला आहे.

या मालिकेतील अर्जुन-सावीवर प्रेक्षकांनी कायमच प्रेम केले. कधी त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला, तर कधी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दोघांवर अनेक संकटेही आली, मात्र त्या प्रत्येक संकटावर त्यांनी एकमेकांना साथ देत मात केली. प्रत्येक वेळी सावी अर्जुनच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. प्रेक्षकांना अर्जुन आणि सावी कायमच आपलेसे वाटले.

प्रेक्षकांच्या या प्रचंड प्रेमाच्या बळावरच या मालिकेने यशस्वी ४०० भाग पूर्ण केले. सावी आणि अर्जुनच्या आयुष्यात आणखी काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहा “पिरतीचा वनवा उरी पेटला”, सोम – शनि, रात्री 10:00 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही #JioCinema वर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *